फुलपाखरू
फुलपाखरू

1 min

11.5K
इवल्याशा अळीतून
निघाले फुलपाखरू
रंगीबिरंगी पंख घेऊन
फिरती बाग बागेतून
सुंदर मखमली पंख
करतो उघडझाप
त्यावरचे ठिपके
दिसतात किती छान
परागकण घेऊन
फुलांवरून उडून
चिमुकल्या पंखांनी
घेतो सर्वांचे
मन मोहूनी
उडते भरकनी
वाटते पकडुनी
साठवावे नयनी
फुलपाखरू दिसते किती छान!!