फुलपाखरू
फुलपाखरू


जीवन उत्क्रांतीतून
जीवन शिकवे जीवनात
राखे मधूनी फ़िनिक्स उडावे
जसे फुलपाखरू झेपावते अवकाशात
कष्ट साहूनी भाग्याची
वाट पाहि कोशात
भाग्य लाभता
घेई भरारी आनंदे गगनात
टपोर मोती नाना विधी
समान वाटणी पंखात
या फुलावर त्या फुलावर
उडत फिरते मोठ्या जोमात
मकरंद चाखूनी
परागीभवनाची किमया करी
जाता जाता क्षणात
मोती भरण्या धनधान्या चे कणाकणात
बागेमध्ये वनांमध्ये
संचार यांचा मोठया तोऱ्यात
बालचमुना घेतात
आकर्षून आपल्या होऱ्यात
अशी यांची दुनिया
सारी रंगीबिरंगी जगतात
जो तो यांच्या मागे धावे
आनंद लुटण्या आनंदात....!!