फुलपाखरू
फुलपाखरू
1 min
410
सुंदर किती अन् मोहक ते
फुलपाखरू स्वच्छंदी
क्षणात इथे, तर क्षणात तेथे
स्वैर फिरे आनंदी
बंधन त्यास न, जगी कुणाचे
फुलांवरी रमती
कौतुक त्याच्या सौंदर्याचे
लहान-थोर करती
देह तयाचा, रंगीत सुंदर
जणू रंगांची उधळण
सौंदर्याचा अविष्कार तो
मनास करी प्रसन्न
नित दिसावे, मजला तु रे
मनास माझ्या आशा
सौंदर्याचा खजिना सारा
पसरो दाही दिशा
