STORYMIRROR

Smita Murali

Others

3  

Smita Murali

Others

फुलपाखरु

फुलपाखरु

1 min
297

दारात बहरले तेरड्याचे तरु

फुलाला पाहून आले फुलपाखरु 

लाल लाल फूलाचा मोहक रंग

फुलपाखरु फुलात झाले हो दंग


फुलपाखराचे पंख काळे काळे

पांढर्‍या रंगाचे त्यावर छान गोळे

फुलाच्या नाजूक पाकळीवर बसले

पाहून त्याला फूल गोड हसले


फुलाशी केली त्याने अशी दोस्ती

दोघांनी मिळून केली छान मस्ती

लाल लाल फुल ते उमलले मस्त

मधुरस केला फुलपाखराने फस्त


फुलासोबत त्याचा रंगला खेळ

 घरी परत जाण्याची झाली वेळ

हळूच उडाले ते फुलापासून लांब

फुल त्याला म्हणे जाऊ नको थांब


परत भेटण्याचे वचन दिले

ऐकून फुलाचे समाधान झाले

फुलांनी बहरता तेरड्याचे देठ

रोज रोज होते दोघांची भेट



Rate this content
Log in