STORYMIRROR

sarika k Aiwale

Others

4  

sarika k Aiwale

Others

फुलपाखरांचा थवा

फुलपाखरांचा थवा

1 min
488

बहरला फुलांचा मळा 

उमलत्या कळी सवे 

फ़ुलपाखरूचा थवा 

बहरला फुलांचा मळा 


रंगीबेरंगी हसरी धरा 

खळखळून वाहतो झरा 

बहरला फुलांचा मळा 

पहाटेच्या सोन किरणांस

लाजली कळी गुलाबाची


बहरला फुलांचा मळा 

ओढ नव्या जीवाची 

फुलपाखरा च्या मनी 

बहरला फुलांचा मळा 


स्वानंदाने बागडे मन

त्या फुलपाखरसवे 

बहरला फुलांचा मळा.. 

इंद्रधनू ची आरास वाटे 

बहरला श्रावण झुला तो



बहरला फुलांचा मळा.. 

विहरला तो रात काजवा

भुलली ती कळी फुलपाखरा 

बहरला फुलांचा मळा.. 

सजली ही सुंदर धरा 



गंधाळली ही सृष्टी पुन्हा

बहरला फुलांचा मळा.. 

बहरला फुलांचा मळा 

उमलत्या कळी सवे 

फुलपाखरांचा थवा...


Rate this content
Log in