फुले
फुले
1 min
216
मी गुलाब तू मोगरा
मी रंगीत तू पांढरा.....
सुवास दोघांनाही
मंद मंद सा काही.....
झाड काटेरी गुलाबाचे
झाड छोटेसे मोगर्याचे ......
लाल गुलाब आईला
पांढरा मोगरा ताईला.....
गुलाबाचा गुलकंद छान
मोगर्याचा गजरा सान.....
गुलाबाचे रोपटे अंगणी
मोगर्याचे झाड नभांगणी....
मोगर्याचा गजरा केसात माळा
गुलाबाचा हार साईंच्या गळा.....
