फुलबाग
फुलबाग
1 min
554
फुलांचा ताटवा,
अंगणी फुलला,
विविध रंगांचा
गंध बरसला ।। 1।।
सोनेरी पिवळा,
चाफा उधळला,
गंधित सुगंध,
केसात माळला ।। 2 ।।
पांढरा मोगरा,
गंधाळला असा,
कोपरा, कोपरा,
मधाळला जसा ।। 3।।
फुलांचा तो राजा,
सजे काट्यावर,
गुलाबी रंगाच्या,
मखमलीवर ।। 4 ।।
हिरव्या हिरव्या,
कवठी चाफ्याला,
पांढरा अत्तर,
आंदण दिधला ।। 5 ।।