STORYMIRROR

Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

फुलांचा राजा

फुलांचा राजा

1 min
242

रंग आगळे वेगळे

परिमळ दरवळे

कुणी रसिक मजला

भेट म्हणून वापरे


लाल गुलाबी पिवळा

केसरिया नि पांढरा

प्रेमिकांचा लडिवाळा

स्पर्श कोमल देणारा


रंग गंधासाठी तर

राजा असे मी फुलांचा

पुष्पगुच्छ हारांमधे

अग्रक्रम गुलाबाचा


पण आहेत देठाला

मोठे टोकदार काटे

उणीवांची ठेव देव

कशी सगळ्यांना वाटे!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन