फुल
फुल




नसतात मुली आईबापासाठी ओझे
म्हणून नाही शोधत त्यासाठी नवरे
मुलीच्या भावी सुखासाठी असते ती तडजोड
म्हणून तर बांधला जातो सप्तपदीचा दोर
आपल्या काळजाच्या तुकड्यांला दिले जाते परक्याच्या हातात
नीट सांभाळ कर रे बाबा हीच असते आस
त्या मुलीला ही वाटते फुलावे फुलासारखे जसे होते आई-वडिलांच्या घरी
सुदैव असते थोडयाचे जी फुलतात तशाच तशी
बाकी दुदैवी कोमेजून जातात आपुलकीच्या पाण्याअभावी