फुकटचे सल्ले
फुकटचे सल्ले

1 min

174
मॅच्युरिटी मॅच्युरिटी
नेमकं काय हे असतं
मोजून मापून जगायला
मला जमत नसतं
अशीच वाग,असंच कर
अजूनही देती सल्ले काही
३२वर्षाची झालीस तरी म्हणे
मॅच्युरिटी नाही आली
आयुष्य दिलं परमेश्वराने
जगू द्या की मला जरा
कला माझी जोपासुद्या
मुक्त श्वास घेऊद्या जरा
निमूटपणे करते माझं काम
त्रास कोणाला देत नाही
तुमच्या मते मॅच्युर व्हाहिला
मी बँकेची FD नाही