फटका
फटका
1 min
400
करू नको अशी घाई गडबड
रंग तुझा हा हिरवट गं
वेणीमध्ये भरून घे हा
मनसोक्त ही मळवट गं
कोरस
रामा दाजी तू ग
मैना माझी तू ग....
वसंतातील झाड तुझे हे
सुगंध तुझा बळकट गं
लेणे घे हे सुहासनीचे
कुंकू तुझे हे हावरट गं
कोरस
पिढ्यान पिढया तुडवलेली
पायवाट ही मळकट गं
लाजू नको जवळ ये जरा
परंपरेची वहिवाट गं
कोरस
सोडून दे हा लाजरेपणा
कोणती नाही अट गं
घाटावरती चढून पाहाणे
जगाचा हा परिपाठ गं
कोरस
लटपट ही चालू नको गं
डुले कमरेचा मधुघट गं
घटामधले अमृत पिण्या
आसुसले व्हट गं
कोरस
