STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Others

3  

Shobha Sanjay Bavdhankar

Others

|| फळ कथा सफल संपुर्ण ||

|| फळ कथा सफल संपुर्ण ||

1 min
252

देवाने ठरविले फळांच्या दुनियेत

चला जाऊ मनसोक्त फळं खाऊ 


विष्णुला आवडतात केळी

हसतमुख उभे असतात प्रत्येक वेळी 


लक्ष्मीला आनंद होतो मनात बघता डाळिंब लालचुटूक

सरस्वतीला चाखावेसे वाटतं मधल्या वेळेस चिंचेचे बुटूक 


शंकराला सोमवारी वाहायचे बेलफळ

मारुती खट्याळपणे काढतो कळ 


तोर्‍यात म्हणतो आणा करवंद

माकडमेवा आवडीने करू श्रीरामाची चरणसेवा 


गणपतीला चढवावे श्रीफळ

प्रसाद खाऊन वाढते बुद्धीचे बळ 


विसावा मिळता दत्तगुरू खातात द्राक्षं

मुखाने जप, हातात रुद्राक्ष 


सीताफळावर मारतो ताव कान्हा

बासरी वाजवुन मारतो मधुर ताना


देव म्हणाले फळांची चव न्यारी

चवीने खाणार्‍याचे आरोग्य भारी ॥


Rate this content
Log in