फक्त प्रेम
फक्त प्रेम
फक्त प्रेमच बेटर असते
लग्नानंतर हवी ती डिश ऑर्डर करा अशी बायको म्हणजे एक वेटर असते ॥१॥
फक्त प्रेमच बेटर असते
नजरेला नजर एवढीच मूव्हमेंट असते
लग्नानंतर हवे तेवढे डोळे वटारा
अशी बायको म्हणजे एक सर्व्हन्ट असते ॥२॥
फक्त प्रेमच बेटर असते
प्रेम म्हणजे एक थ्रिल असते
लग्नानंतर मात्र खिशात किराणा मालाचे बिल असते ॥३॥
फक्त प्रेमच बेटर असते
एकमेकांसाठी लाईफ एंगेज असते
लग्नानंतर सगळेच चेंज असते ॥४॥
फक्त प्रेम बेटर असते
दोघांचे एकदम प्रायव्हेट मॅटर असते
लग्नानंतर मात्र शेजाऱ्यालाही ऐकू जाईल असे अॅक्टीव्हेट केलेले चॅटर मॅटर असते ॥५॥
फक्त प्रेम बेटर असते
दोघांनी एकमेकांसाठी गायलेले साँग असते
लग्नानंतर मात्र दोघांनी केलेली एकमेकांची चॉईस राँग असते ॥६॥
फक्त प्रेम बेटर असते
प्रेम म्हणजे गॉड गिव्हन गिफ्ट असते
लग्नानंतर मात्र आयुष्यभर लिहिण्याजोगे एक मोठ्ठे स्क्रिप्ट असते ॥७॥
फक्त प्रेम बेटर असते
प्रेमात सगळे कुल अँड कोल्ड असते
लग्नानंतर कसेही असले तरी
हॉट हॉट लव्हली लव्हली वर्ल्ड असते ॥८॥
