फक्त माणूस
फक्त माणूस
1 min
47
शाश्वत असतो आत्मा,सत्य फक्त अंतर्मन
लिंगभेदामधे त्याचं उगीच पुनर्वसन.
नवजात जन्माला कुठे असतं कसलं आवरण?
गरज नसताना केलेलं एक-एक वर्गीकरण.
माणसाला' माणूस'म्हणून पहायला लागते वेगळीच नजर,
स्वार्थी राजकारण वगळलं जगण्यातूनच जर!
समवेदना जागवल्या परदुःख जाणिवांच्या,
कमी होतीलही आत्महत्या मानसिक तणावांच्या.
