फिर्याद...
फिर्याद...
1 min
4
फिर्याद केली तुझ्या दरबारी ,
सोडून जाऊ नको गं मला,
मजधार मध्ये अडकली ,
नाव एकटी माझी संसारी ....
फिर्याद केली तुझ्या दरबारी,
लोचनांना आळवी प्रीत बावरी,
तु कान्हा मी राधा प्रिया ,
वेणूची धून मना सावरी ...
फिर्याद केली तुझ्या दरबारी ,
निशीगंध आठवे रिमझीम सरी ,
ओघळला तो अलवार असा की,
प्रेमात हरवली प्रित गोजीरी...
फिर्याद केली तुझ्या दरबारी ,
हातातला हात कसा सोडू सावरी,
विरलेल्या सावल्या मिळाल्या कवेरी,
टाहो फोडत आहे स्वप्नभंग नवरी ...
