STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

फिनिक्स (अमरपक्षी)

फिनिक्स (अमरपक्षी)

1 min
383

सावित्रीने शिक्षणाचा वसा घेतला

मुलींच्या शिक्षणाचा पाया रोवला.....


संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचा वसा घेतला

स्वतः हाती झाडू घेवून गाव स्वच्छ केला.....


संतांच्या कार्यातून समाज घडला

सोडून दिले त्यांनी सुखी संसाराला.....


जिजामातेच्या उपदेशाने शिवबा घडले

माऊलीच्या संस्कारांचे चीज झाले...


बाबा महाराजांनी उत्तम विचारातून

समाज प्रबोधन केले किर्तनातून...


संत ज्ञानेश्वरांनी आपल्या कार्यातून

जिंकले जनमाणसाला आपल्या वाणीनं......


फिनिक्स पक्ष्याप्रमाणे अमरत्व लाभले 

राखेतूनही घेतली भरारी यांनी गगन गाठले.....


Rate this content
Log in