STORYMIRROR

Dinesh Kamble

Others

3  

Dinesh Kamble

Others

पहिलं प्रेम

पहिलं प्रेम

1 min
11.8K

मी डोळे उघडले तेव्हा

ती एकटक माझ्या़कडे 

पाहत होती 

ती आता विसरली होती 

त्या मरण यातना 

ज्या मी तिला दिल्या, 

किंबहुना तिनेच 

त्या स्विकारल्या असाव्यात

मला या जगात आणण्यासाठी 

आमची नजरानजर झाली 

आणि 

आम्ही प्रेमात पडलो एकमेकांच्या 

माझं नाही सांगता येणार 

पण ती मात्र त्याच क्षणाला 

माझ्या प्रेमात पडली होती हे मात्र खरे.

मग हळूहळू मला ही 

तिचा लळा लागतं गेला 

तिच्यासाठी मी बैंचेन होऊ लागलो

आणि सुरू झाली 

मग एका निर्विकार 

प्रेमाची कहाणी 

अशीच काही वर्षे

 निघून गेली

माझ्या आयुष्यात 

तिच्याव्यतिरिक्त आता

दुसरी कोणीतरी डोकावली 

आणि मी तिच्यातच गुरफटून गेलो

इतका इतका गुंतलो तिच्यात 

कीं तिला घेऊनी मी 

शहरात आलो

आणि माझं पहिलं प्रेम 

गावाकडेच विसरुन आलो


Rate this content
Log in