पहिली सर
पहिली सर
1 min
56
पहिली सर
जमू लागले ढग आभाळी
आलं आभाळ भरून
सुर्य पळे ढगा आडूनी
धरणी वरती अंधार करून
पहिली सर पावसाची
धरणी ओलिचिंब होई
ओल्या माती मधूनी
सुगंध दरवळत जाई
मोसमात पडतो पाऊस
पहिल्या सरीची असते आस
कडकडणा-या विजे सह
झुळूक वा-याची येते खास
कधी अवेळी, कधी मोसमी
पहिल्या पावसाची मजा न्यारी
ओला चिंब होई निसर्ग
आनंदित होते सृष्टी सारी
पहिल्या पावसाच्या सरीत
भिजण्याचा मोह होतो मला
निसर्गातील जीवसृष्टीस
पहिला पाऊस असतो खुला
