STORYMIRROR

Prashant Shinde

4  

Prashant Shinde

पहिली रात्र....!

पहिली रात्र....!

1 min
790


पहिली रात्र....!


पहिली पहाट

पहिला दिवस

पहिली रात्र

नव्या वर्षांची आनुभवतांना

खूप बर वाटतं


सकाळ पासून सार

मागच्या वर्षी ठरवलेलं

जेंव्हा पार पडलेलं असतं

पहिला चहा

पहिलं सूर्य दर्शन

पहिलं मानाच पान

पहिली शुभेच्छा


साऱ्या पहिल्या पहिल्या

लेबलाच्या पहिल्या गोष्टी

पण त्याच त्याच

जणू जुनी ...

लेबल लावून

नवी नवी म्हणून

स्वीकारल्या सारखी

पण इतकं नक्की

आज बर वाटतं


कालच सार विसरल गेलं

आणि नवं पान आज

दैनंदिनी साठी

मी उघडलं

म्हंटल काहीतरी लिहावं

आणि इतकंच लिहिलं

झोपताना

मी सुखी आहे

समाधानी आहे

आनंदी आहे

खरेच देवा मी भाग्यवान आहे

शुभ रात्री...!


Rate this content
Log in