पहिली भेट
पहिली भेट
जेव्हा पुस्तकांशी झाली माझी पहिली भेट
आनंदानेच भारावून गेले ना हो मी थेट १
उलगडत गेले मी पुस्तकांची पाने नव्याने
तसतसे जीवन फुलतच गेले माझे सुखाने २
साहित्याचा आस्वाद जसजसा आवडू लागला
तशी आपोआप उभारी येऊ लागली मनाला ३
पहिल्या भेटीतच मी सर्वस्व अर्पण केले
आजपर्यंत पुस्तकांनी मला भरभरून दिले ४
वाचाल तर वाचाल,वाचवाल म्हणतात
पुस्तके भेटल्यावर जीवन सार्थकी लावतात ५
प्रगल्भ विचार, समाधान हळूहळू मिळते
जीवनाचे सारच जणू हृदयाला भिडते ६
पहिली नाही तर कायमचीच भेट असावी
म्हणजे लिहिण्यासाठी ऊर्मी मिळत रहावी ७
विविध प्रकारचे वाचन करीत राहिल्यावर
सुखशांती मिळली मनाचा गाभारा भरल्यावर ८
पुस्तकांच्या पहिल्या भेटीतच मी भारावले
एकदा डुंबायचे ठरवल्यावर जीवन स्थिरावले ९
कुणाची पहिली भेट प्रेमीयुगुलांची असेल
पण पुस्तकांसारख्या अथांग सागराची नसेल १०
मनातील जळमटे,अंधश्रद्धा निघूनच गेली
पुस्तकांच्या पहिल्याच भेटीने तर कमालच केली ११
वारंवार भेटण्याने छंदच जडला मनाला
वाचनाच्या सवयीने आकार येतो जीवनाला १२
अशी पुस्तकांची पहिली भेट सर्वांनीच घ्यावी
नंतर जीवनात विचारांना प्रगल्भता यावी १३
कुणालाही पुस्तकांची पहिली भेट अप्रतिमच वाटणार
तेव्हाच मनामनाचे धागे आनंदाने जुळणार १४
