पहिली भेट.....
पहिली भेट.....
1 min
229
आठवांच्या किनारी
पहिली भेट खास ती
तारा छेडत स्पंदनाच्या
होऊन गेली श्वास ती
हरवलेल्या वेळांची
वाढलेली आस ती
अंतरीचे चोरून भाव
भिडली मनास ती
रोखतो श्वास माझा
स्मरण्या पुन्हा सारे
अबोलपणी असाही
देऊन गेली सहवास ती
चांदण्यांचा शिंपडाव
भासवे आज ही तो
कप्प्यात ह्रदयाच्या
जपली हर क्षणास ती.
