पहिले प्रेम
पहिले प्रेम
1 min
271
जगी सर्व सुखी
असे ज्याला आई
होऊ सांग कशी
तुझी उतराई
जन्म दिलास तू
साही गर्भकळा
जीवनात माझ्या
फुले प्रेममळा
पहिलेच प्रेम
आई तुझ्यावर
सर्वश्रेष्ठ कोण
तू असल्यावर
शाळेतील बाई
प्रेमाच्या धनी
संस्कार शिदोरी
पुरवी जीवनी
ज्ञान शिक्षणाची
भरलीय झोळी
फेडू कसे पांग
मी लाडकी बाळी
