*पहिले प्रेम म्हणजे काय असतं
*पहिले प्रेम म्हणजे काय असतं
वसुधा होती सतरा वर्षाची
प्रेम म्हणजे काय?समजतही नव्हते
तेव्हाच लग्न झाले वैभवशी
प्रेम करणे दूर, पण कसे वागावे हेही कळत नव्हते....
साखरपुडा झाला वैभवबरोबर
त्याचसमयी त्यास पाहिले
वैभव मनास भावला होता
त्यालाच मी माझे ह्रय वाहिले...
आमचे पारंपारिक पद्धतीने लग्न झाले
संसार छान झाला मग सुरू
एकमेकांबरोबर आम्ही दोघे
हातात हात लागले मस्त फिरू....
सिनेमा पहायचा,बागेत जायचे
सारसबागेतीलभेळ,पाणीपुरी खायची
मस्त एकमेकांच्या खांद्यावर
डोके ठेवून ह्रयी स्वप्ने रंगवायची.....
हे जीवन आहे सुंदर ,छान
अशी प्रचीती मला झाली
आणि आता ती सत्यात उतरू लागली
मनी फूल बनून बहरून आली....
माझे लग्न हेच माझे पहिले प्रेम
वैभवबरोबर या संसारी आहे मी आनंदी
कुटुबातील सर्वांसमवेत आहे मी
अगदी फुलपाखराप्रमाणे स्वच्छंदी....
