STORYMIRROR

Vijay Kadu

Others

4  

Vijay Kadu

Others

पहिला थेंब

पहिला थेंब

1 min
160

काळ्या काळ्या ढगांच्या रांगा

आकाशी गर्दी करु लागल्या

म्हणत पहिले कोण ,पहिले कोण

सरसर पावसाच्या सरी धावल्या !!१!!


थेंब तो पहिला सरीचा

जणू जन्म नव अभ्रकाचा

स्वागत करती सारी सृष्टी

होता वरुणराज्याची वृष्टी!!२!!


पाना फुलांतून पक्षी मनातून

हर्ष ओघळे कणाकणातून

सुखावतो जवान नि किसान

पेरीतो मातीत आपुली जान!!३!!


प्रतिक्षा मिटते कोकिळेची

आग क्षमते भू मातेची

पहिल्या सरीची ती नवलाई

लुटत असते सारी सृष्टी!!४!!


हिरवा शालु धरती नेसतो

नव वधु ती जणू भासती

नदी ही खळखळ वाहती

जणू सुस्वरे ती आळवीती!!५!!


Rate this content
Log in