पहिला प्रेमभंग
पहिला प्रेमभंग
1 min
14K
पहिला प्रेमभंग
जसा प्राजक्त ओघळला
पहाड कोसळला
भावनांचा.
पहिला प्रेमभंग
कोमेजले नाजूक मन
संपले प्रेमधन
हृदयाचे.
पहिला प्रेमभंग
उरल्या दाहक आठवणी
विरहाची जीवघेणी
आग.
पहिला प्रेमभंग
जीवन करी लाचार
घेऊन माघार
क्षणोक्षणी.
पहिला प्रेमभंग
वणवा होऊन जळणे
सत्यता कळणे
जीवनाची.
