पहिला पाऊस
पहिला पाऊस
1 min
181
जमीन तापली होती चुलीवरच्या तव्यासारखी,
पावसाने मिटवली तहान नवीन जीवनासारखी.
बळीराजाला चिंता लागली होती कशाची?
घरट्यांच्या पाखराची चूल पेटते याच्या श्रमाची.
पहिल्या पावसाचा आनंद व्यक्त नाही होत,
व्याकुळलेल्या मनाची शंका दूर नाही होत.
पावसात भिजण्याचा आनंद वेगळाच दिसून येतो,
वर्षभराची तहान क्षणात मिटऊन जातो.
कुठे जास्त कुठे मध्यम तर कुठे कोरडाच राहण्याची सवय याला,
कुठे उपद्रव माजवितो तर कुठे गरजवंतांची गरज भागवतो.
पावसाचे क्षण नवजीवन शिकवून जातात,
गळलेल्या झाडाला देखील पालवी फुटून देतो.
