पहिला पाऊस
पहिला पाऊस
1 min
121
रंगाची उधळण
इंद्रधनूची कमान,
हिरवळीची मखमल
गालिच्या समान.
पावसाळी ऋतू
वातावरण कुंद,
भिर भिर वारा
मातीचा गंध.
थरथरणारे माड
फेसाळणारा सागर,
हिरवीगार झाड
मेघांचा जागर.
दुमदुमणारा गजर
काळेकुट्ट मेघ,
दाटलेले आभाळ
विजेची रेघ.
भिजलेले रान
ओलीचिंब धरती,
ओल्या रानामध्ये
ओलिगार माती.
मातीवर मोराचा
पदन्यास झाला,
दिमाखदार डौलात
पहिला पाऊस आला.
