STORYMIRROR

Smita Murali

Others

4  

Smita Murali

Others

पहिला पाऊस

पहिला पाऊस

1 min
221

कडक भासला तेंव्हा उन्हाळा

जेंव्हा सूर्याने ओकली आग 

अचानक आटले नदीनाले मग

दुष्काळग्रस्त झाला काही भाग


उरल्या सुरल्या झाडांनी धाडला

लहरी पावसाळी मेघराजा

विजांचे नृत्य संगीत साथीला

नभात पावसाचा गाजावाजा


चकवाचकवी खेळ चालता

मेघा पळवितो वादळ वारा

गार स्पर्श तो वार्‍याचा होता

कुठे थेंब कुठे बरसल्या गारा


धो धो बरसत आला आला  

रानी अंगणी पहिला पाऊस 

थेंब टपोरे रिमझिम झेलता

पुर्ण जाहली भिजण्याची हौस


पहिला पाऊस भिजवून गेला 

रानातल्या मातीचं काळं रुप

 बरसावा असाच पाऊस झरझर

बळीच शिवार मग फुलेल खूप


झाडांनी केली कृपा आम्हावर

त्यांनीच धाडला पहिला पाऊस

चला वाढवू झाडी नि जंगल

तेंव्हाच पडेल नेमाने पाऊस 


Rate this content
Log in