फेरफटका
फेरफटका
मोबाईलच्या पडद्यावर
बोटाने वर खाली
सतत करण्याचा
कंटाळा खूप आला
उगाच कोणाच्या तरी
प्रोफाईल मध्ये डोकावत
आभासी जगात फेरफटका मारायचा
कंटाळा खूप आला
पाऊले आपोआप घराबाहेर पडली
तर रस्त्यावरच्या गर्दीतला माणूस
मोबाईल मध्येच अडकलेला पाहण्याचा
कंटाळा खूप आला
दुचाकी चारचाकीवाले गुगल मॅपमधेच अडकले
उजवीकडे, डावीकडे वळा नाही काही कळले
गोल गोल फिरत आहे तीथेच परतले पाहण्याचा
कंटाळा खूप आला
माणसाला थेट माणसाशी बोलायला लाज आता वाटते
काही विचारयच, बोलायच असल्यास
सोशल मिडियाचा आधार घ्यावा लागतो हे पाहण्याचा
कंटाळा खूप आला
खर्या जगात फेरफटका मारताना आता
झाडांशी बोलुन कंटाळा न करता
ताजे तवाने व्हावस वाटत
ताजे तवाने व्हावस वाटत!
