STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

फेरफार

फेरफार

1 min
218

मुलं अभ्यासात होती मग्न

अभ्यास झाला मस्त शांततेत

आता ती चुळबूळ करू लागली

वर्ग झुकू लागला हो अशांततेत...


काय बर द्यावे आता मुलांना

मुलांना मैदानावर खेळायला नेले

जरा प्रास्ताविक हालचाली घेतल्या

मुलं आनंदानं उड्या मारू लागले...


ती जरा दमली व मैदानावरच विसावली

मग मुलांचा मस्त एक मोठा गोल केला

"कानगोष्ट" खेळण्याचा नियम सांगितला

मुलांनी खेळ छान समजावून घेतला...


बाईंनी वाक्य एकाच्या कानी सांगितले

त्याने ते वाक्य शेजारच्याच्या कानी गोवले

असे करत पंधराव्या मुलाला ते सांगितले

वाक्यात झाला फेरफार शेवटी शब्द गाळले...


शेवटचा मुलगा उठला, वाक्य सांगितले

बाईंसहीत पहिल्या पाच मुलांत हशा पिकला

शेवटच्या मुलाला कळेना काय झाले?

कळले त्याला जेव्हा, तेव्हा हशा वाढला...


Rate this content
Log in