फॅशन
फॅशन
सारं विश्व लागलंय आता फॅशनच्या युगात वळायला
जग हे लागलंय आता फॅशनच्या नावाने पळायला ।।धृ।।
थोडं स्वातंत्र्य स्त्रीला मिळाल्यामुळे कुठला शृंगार करण्याची आज पडत नाही तिला गरज
पण कोण सांगणार तिला? पूर्वी मळवट लाल असतांना ते कपाळ शोभत किती होतं खरंच
लाज वाटायला लागलीये तिला आता कपाळी कुंकू लावायला
कारण जग हे लागलंय आता फॅशनच्या नावाने पळायला ।।१।।
पूर्वी सर्वांची फॅशन एकसारखीच होती जरी कुणी मोठे कुणी बारके होते
चेहरे जरी वेगळे असले तरी सर्वांचे साज मात्र सारखेच होते
प्रत्येक जण लागलंय आता एकमेकांचे वस्त्र पाहून जळायला
कारण जग हे लागलंय आता फॅशनच्या नावाने पळायला ।।२।।
लग्नानंतर स्त्रीने साड्या घालायच्या की ड्रेस हे लग्न करण्यापूर्वी काही ठरत नाही
म्हणून स्त्रीच्या डोक्यावर पदर गरजेचा असण्यासारखं कारणच काही उरत नाही
आता ड्रेसची फॅशन आल्यामुळे साड्या कपाटातच लागल्यायत मळायला
कारण जग हे लागलंय आता फॅशनच्या नावाने पळायला ।।३।।
या मोबाइल चॅटिंग च्या समाधानामुळे आता कुणाच्या जाण्याने कुणाचंच मन रडत नाही
आता कुणाच्या जाण्याने किंवा येण्याने कुणालाच काही फरक पडत नाही
आता समोर सर्वकाही असूनही मन मोबाइल मधेच लागतं रुळायला
कारण जग हे लागलंय आता फॅशनच्या नावाने पळायला ।।४।।
त्याच मोबाइल मध्ये रुळता रुळता गृहिणी फॅशनच्या युगात घसरून जाते
ती तिच्या घरची लक्ष्मी आहे हेच मुळी विसरून जाते
ती हे विसरून जाते की, मोबाईल फक्त आहे थोडं जागाचं ज्ञान कळायला
पण करावं तरी काय,जग हे लागलाय आता फॅशन च्या नावाने पळायला ।।५।।
सणांना तर परिधान कर शृंगार निदान लक्ष्मीचा मान ठेवायला
फक्त थोडी कमी कर फॅशनची ओढ निदान संस्कृतीची जाण ठेवायला
चला तर थोडे प्रयत्न करूयात या फॅशनचं वेड टाळायला आता यापुढे जग लागायला नकोय फॅशनच्या नावाने पळायला,
यापुढे जग लागायला नकोच फॅशनच्या नावाने पळायला ।।६।।
