पहाट
पहाट
1 min
127
उठतात भल्ल्या पहाटे
एक सूरात चिवचिवाटात-किलबिलाटात
पंखांची उघड झाप
साद एकमेकांना घालतात!
पांघरुणातच मी लोळतो
एकतो गुंजराव त्यांचा
मनात आखतो आराखडा
सुरवात दिवसाची आंनंदाची!
किलकिले डोळे करत
खिडकितून डोकावतो बाहेर
गाणे, उडणे त्यांचे बघणे
मनाला देते उभारी!
अशीच रोज पहाट
असो माझ्या जीवनी
उठताच मानतो आभार
निसर्गाच्या रंगमंचांच्या देवतांचे!!
