STORYMIRROR

Mrudula Raje

Others

3  

Mrudula Raje

Others

पहाट वारा

पहाट वारा

1 min
407

पहाटवारा स्पर्शतो अंगाला

देई गारवा शीतल मनाला।

शांत सुखद ,थंडगार वारा

जणू पडती, नभातुनी धारा॥


अरुणोदय पाहण्या थांबला

विहग गण आकाशी पांगला।

नदीकिनारी पाणवठ्यावर

नारी भरती जळाने घागर॥


नदीचा घाट , मंदिराची शोभा

कळसावरी भास्कराची प्रभा।

मंदिरामध्ये होई घंटानाद

भक्तजनांना लाभतो प्रसाद॥


निसर्गरम्य , सुंदर पहाट

शेतक-याला साद दे शेतात।

शेतामधुनी , डोलतात पिके

बळीराजा त्यां कौतुके निरखे॥


पहाटवारा झोका दे रोपांना

कारभारीण पाणी पाजे त्यांना।

देवाची कृपा , घरादारावरी

सौख्य लाभावे , आस ही अंतरी॥


Rate this content
Log in