पेनात शाई भरताना
पेनात शाई भरताना
1 min
230
पेनात शाई भरताना
कागद ठेवला होता
दौतेच्या खाली
हात थोडा हलला
पेनात शाई भरल्या गेली थोडी
अन् कागदावरच सांडली जास्त
कागदावर पडलेल्या शाई मध्ये
चुकुन पडला खाऊचा दोरा
खाऊचा दोरा माखला गेला शाईत
खाऊचा दोरा उचलताना
कागदावर तयार झाले
नव नवे चित्र
चित्रात शोधत गेलो
नव नवे आकार
आत्मयतेने तल्लीन होऊन!
