पेल्यातले वादळ
पेल्यातले वादळ
1 min
155
पेल्यातील वादळ
पेल्यातच ठेवावे
तरंग उठताच
बुडबुडे विरावे
आपण नाही कोणी
संत महंत महान
राग क्रोध उफाळता
शब्द ओठावरी अजाण
लागते भांड्याला भांडे
होतच असतो नाद
वाढवायचा नसतो
भांडणाचा काल
घ्यावे मिळतेजुळते
Forget & Forgive
सुरु करावे बोलणे
सुखी जीवनाची रीत
पेल्यातील वादळे
पेल्यातच शमतात
आठवणींचे तरंग
मनाला समजावतात
