पडदा
पडदा
पडदा उघडला जीवनाचा ....
नांदी सुरु झाली जन्माची ....
अंक पहिला सुरु झाला बालपणाचा ..
हसरा चेहरा खट्याळ रडणं दुडुडु धावणं आणी आईच्या मायेच्या स्पर्शाचा ...
शाळेच आयुष्यही अनुभवलं ...
नेप्प्थच्या दृश्यांनी आयुष्य पुढे सरकत गेलं ....
अंक दुसरा सुरु झाला ....तरुणपणातला ....
सुंदर संगीतानी पोहचवल ते कॉलेज विश्वात ....
तिथून मात्र मन नाही यायला तयार ....
प्रेमाचे वारे वाहू लागले ....नकळत नोकरीचे ओझे हि आले ....
साथीला सहकलाकार मिळाले जीवनभरासाठी ...
संगीताच्या मधुर धुतींत आयुष्य भर भर पुढे सरकले ....
अंक तिसरा आणि शेवटचा सुरु झाला ....
नेपथ्य हि साधेच होते ... प्रकाशयोजना फिकी होती ....
वेशभूषा गबाळ होती ...
ढोक्यावर पांढरे शुभ्र केस , चेहऱ्यावर सुरुकुत्या ....
कोणाच्या तरी आधार मायेसाठी भुकेलेले ते डोळे ...
संगीतही रडवणारे ..
कोणीच सहकलाकार नाही ....
क्षणात संगीत बंद होते ...
नाटकाचा पडदा पडतो ...प्रेशक उठून जातात ...
सगळीकडे शांतता पसरते ....कलाकारांच्या हावभावाला विराम पडतो ....
मात्र थोड्या दिवसात तसवीर भितीला लावलेली दिसते .....
