STORYMIRROR

Ankit Navghare

Others

3  

Ankit Navghare

Others

पैसा

पैसा

1 min
12K

....जवा माणसाले लय 

सारे पैसे मिळवाची घाई

वाटते तवा पैसा सोडुन 

कवा काई दिसतच नाई....


...मंग माजतो व्यभिचार ,

 आणी बंद विवेकाचं दार 

वाहत कानामधी वाहत

ते श्रिमंतीचच वार...


...तवा आपला माणुस 

त्याले वाटतो परका 

म्हणे पैसाच देव माझी 

हिच मायी व्दारका ...


...जिवन आरामात चालु ,

चैनेच्या वस्तुंचा हव्यास 

अधीमंधी होत त्याला 

वेड असल्याचा भास ...


...कागद्याच्या तुकड्यासाठी 

सारा स्वाभिमान ठेवतो गहान

होतो बंगला, गाडी, पैसाही मोठा ,

पण तो माणुस म्हणुनी लहान ...      


Rate this content
Log in