STORYMIRROR

Sharad Kawathekar

Others

4  

Sharad Kawathekar

Others

पायवाटा

पायवाटा

1 min
424

विखुरलेल्या पायवाटेवरून चालताना 

पायाला सतत काहीतरी सलत होतं 

काहीतरी खुपत होतं 

तरीसुद्धा पुढंपुढं जातच होतो 


जाताना पडत होतो 

धडपडत होतो 

तरीपण जातच होतो 


जगण्याला पुकारत क्षण क्षण मरत होतो

आणि मनातील सल काळजापर्यत जात होती 

झाडाच्या अंधाऱ्या सावलीत

बेफिकीर ऊन निवांत पहुडलं होतं 

एखाद्या अजगरासारखं

त्याच विखुरलेल्या पायवाटेवर


Rate this content
Log in