पायवाट
पायवाट
1 min
150
थांबावे कधीतरी
मागे वळून बघाया
चाललेली पाऊलवाट
निरखूनी त्या पहाया
चालले अनेक आजवर
परी कोणी ना वंदिले
शिकलो पाऊलवाटेस
हीन जाणोनी म्हणाया
रुतले असतील काटे
पण पुष्प ही पेरीले होते
दिसले कसे ना चांगले
का वाईट लागले भिनाया?
एकटे न चालू दिले
दिले वाटसरू ही अनेक
स्वार्थाशीच मैत्री करोनी
लागलो अर्थाचे गणित मांडाया
अंध पणाने कधी
पडलो आपणच कारणाने
रस्ताच चुकीचा होता
लागलो त्यास हिणाया
आकाशीचे दिसते सुरेख
स्वप्नास आकांक्षांचे पंख
पायाखाली ही आहे कणखर
पण वय जाते कळाया
उभे रहा क्षणभर
कर जोडोनी मनात
पाय जेथे पडले नी पडणार
त्या वाटेला स्मराया
जाणोनी रहा उपकार
पायवाट साथ न सोडी
सदा पाया खाली जरी
खरी तीच वाट दाखवाया
