पायतान
पायतान
वाचवण्या तळपायाची चामडी, कातडी पांघरत होतो.
स्वता साठीच मालक होऊन, त्याला झीजवत होतो.
विचारात गलिच्छ ते, लागला कलाकारी हात.
चमकदार रूप बहरले, पायतान त्याची औकात.
पायात राहतो सतत झीजतो, माज नाही थोडासा.
प्रगतीच्या वाटेवर, लपन्या पायाला आडोसा.
बिघडलास कधी अचानक, डागडुजी तुझी होते.
काळा कळप घासला तशी, चमक नवी येते.
दारावर त्याच घर, सवंगडी सारे सोबतीला.
आयुष्य तूझ संपताच, फेकून देतो कोपऱ्याला.
विचारी माणसाला, देवाचेच वरदान.
वाचवन्या पायाला, उपयोगी येई पायतान.
