पायपीट (अभंग)
पायपीट (अभंग)
1 min
397
झाले अचानक I लॉकआउट ते |
कळेना काय ते | झाले असे ll १ ॥
कोरोना आजार | म्हणे महामारी |
रहा आता घरी I कोंडोनिया ॥ २ ॥
हातावर पोट | भरायचे कसे |
भयानच दिसे | चित्र सारे ॥ ३ ॥
नाही कोणी वाली | गावी सोडावया |
आली दयामाया | कोणासही ॥ ४ ॥
गाठोडे बांधुन | पायपीट आता I
स्मशान शांतता I भासतेय ॥ ५ ॥
श्रीमंत ते आले | आजार घेवून |
गरीबा मरण I रस्त्यावर ॥ ६ ॥
