STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

पायातील गारवा

पायातील गारवा

1 min
292

बस स्टॉपवर मी तिष्ठत

एकटाच बसलो होतो

वाट पाहण्याची पहाटे

शिक्षा भोगत होतो


पायास चाटून माझ्या

बोचरा वारा खोडी काढत होता

अंगात माझ्या शिरशिरी

घुमवत चाटून जात होता


खांद्यातसुद्धा माझ्या

शहारा उठवत होता

पोटात जणू परीक्षेचा

गोळा फिरवत होता


वाट पाहण्याची मजा

फक्त तिची वाट पाहण्यात असते

हे आज मला पुन्हा जाणवत होते

पण ती येणार याची खात्री असावी लागते


ती कोणीही असो फरक पडत नाही

वेळ मात्र हा जाता जात नाही

आस आतुरतेची सुटत नाही

नजर मात्र कधी हटत नाहीं


आली एकदाची जीव भांड्यात पडला

बेळगाव गाडीचा संग जडला

अशा रीतीने माझा प्रवास घडला

बोचऱ्या थंडीचा एकदाचा पिच्छा सुटला..!


Rate this content
Log in