STORYMIRROR

Smita Murali

Others

3  

Smita Murali

Others

पावसाळी मेघ

पावसाळी मेघ

1 min
204

रवी तापला तापला

वारे वैशाखी सुटले

त्याची धग शमविण्या

मेघ नभात दाटले


मेघ पाऊस घेवून

आले अवचित नभा

डोळे त्यांच्याच वाटेला

बळी रानात हा उभा


कसा कडक उन्हाळा

झाले जीवजंतू त्रस्त

किती नक्षत्र घेवून

आला मेघराज मस्त 


थेंब थेंब बरसला

आला पाऊस जोमात

वारा थंडगार कसा

कसा झोंबतो रोमात


कर कृपा मेघराजा

तुच फुलव शिवार

ऐक बळीचं मागणं

तुला आर्जव त्रिवार!!!


Rate this content
Log in