पावसाळा
पावसाळा
1 min
275
आला आला आला
एकदाचा आला पावसाळा
पहा कसा
आनंदाचा रंगला सोहळा...
घुं घुं करीत
वाराही घुमला
पिंगा धरून फुगडी
जोरात खेळू लागला...
झाडे वेली सारे
आंनदाने डोलू लागली
पहा कशी वनराईने
त्यास लीलया साथ दिली...
हिरवी हिरवी
शाल पांघरून गवतपाती
मंजुळ पैंजण नाद वाजवूनी
थेंबांच्या तालावर थरथरू लागली...
हुडहुडी भरताभरता
मधुर स्वादाची माती
आपला सुवास पसरूनी
हळूच गाली सुमधूर हसू लागली...
पावसाळा आला आला म्हणता
आपल्याच नादात, आपल्याच तालात
आता मनसोक्त कोसळूनी
पहा कसा सुखावू लागला...!
