पावसाला सांग
पावसाला सांग
1 min
222
पावसाला सांगा नको बरसू येथे
आठवणींची ओल अजुन आहे येथे
का घालतेस कोकिळे तू साद नवा
ओठातले संगीत... अजुन आहे येथे
वाऱ्यास हि थांबव तू पल्याड जरा
मंद अत्तराची नशा अजुन आहे येथे
नकोच वाजावु रे तुझे नगाड़े नभा
बिल्लोरी नाद अजुन आहे येथे
कळ्यांनो थांबा उमलण्याची घाई नको
परिजातकाचा सडा अजुन आहे येथे
