पावसाच्या सरी
पावसाच्या सरी
1 min
33
आल्या पावसाच्या सरी
धरणी झाली ओलीचिंब
कुहू कुहू गाणे कोकिळेच
दवबिंदू मोती झाडावरी__1
वारा वाहे झुळुझुळु
वीज येई कडाडून
आकाश होई काळेभोर
पक्षी उडे आवाजाने घाबरून__2
सृष्टी दिसे छान सुंदर
होतसे तिचा सन्मान
हिरवी शाल पांघरून
हर्ष दाटे मनोमन___3
