STORYMIRROR

Aarya S

Others

2  

Aarya S

Others

पावसाचे या करू या स्वागत

पावसाचे या करू या स्वागत

1 min
81

गार गार वारा भरारा 

अंगावरती ओला शहारा ,

आला आला पाऊस आला 

साद घालाया वसुंधरेला . 


हिरवळ हिरवळ हरित नजारा 

मोराने फुलवला पिसारा,

रखीत मृदा ही चिंब ची होता 

आसमंती या दरवळ सारा. 


पाऊस म्हणजे नवीन जीवन 

कोरड भूमी ला संजीवन ,

पाऊस शेता भिजवून जाई 

बळीराजा ही तृप्त ची होई . 


सरीवर सरी या बरसत जाती 

ओला परिसर ,ओली माती, 

छोटुकले ते अंकुर फुटती 

जन्मा येती नवी रोपटी. 


पाऊस म्हणजे खळ खळ पाणी 

पाऊस म्हणजे झूळ झूळ गाणी,

पाऊस म्हणजे काही न अन्य 

पाऊस म्हणजे नव चैतन्य. 


पाऊस आला पक्षी ही गाती 

जसे मेघ हे भरुनी येती, 

वरुण देवाचे आशिष जाणत 

पावसाचे या करू या स्वागत. 


Rate this content
Log in