पावसाचे थैमान
पावसाचे थैमान
2 mins
66
अरे अरे पावसा
थांब ना जरा
कामाचा माणूस
येवू दे घरा......
नदीच्या पाण्याला
पूर रे आला
मानवाला येण्याजाण्याचा
मार्ग बंद केला......
माणसांची घरे
पाण्यात गेली
पावसानं संपत्ती
वाहून नेली....
शेतकरी आता
खूप दुखावला
पावसावर आता
तो खूप रूसला....
पावसाने नुसता
हैदोस घातला
जनजीवनाला त्याने
विळखा घातला.....
श्रावण सरींनो
थांबा आता
सर्वांना किती
त्रास हो देता.....
जिकडेतिकडे
पाणीच पाणी
सावरायला आता
येतेय का कोणी?......
पूरग्रस्तांना आता
मदतीचा हात देवू या
माणूस म्हणून आपण
संकटसमयी कामी येवू या.....
