पावसाचे दागिने
पावसाचे दागिने
1 min
187
पावसात भिजताना, एक थेंब अंगावर,
मनातल्या शिंपल्यात, साठवला क्षणभर,
मोती बनताच त्याला, अलगद जडवला,
हृदयाचा कोंदणात, आठवांत सजवला!
सर एक पावसाची, ओंजळीत बरसली,
सर तिची गळ्यातली, माळण्यास नटवली!
गारा गोळा केल्या, त्यांचे बाजूबंद घडवले,
ओल्या मातीचे पैंजण, त्यास पायात बांधले!
इंद्रधनुषाच्या अंती पहा कित्येक खजिने
त्यातूनच पावसाचे सारे बनले दागिने!
