STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

पावसाचा थेंब

पावसाचा थेंब

1 min
206

आकाशातून पडणारा पावसाचा थेंब हातावर,

झेलला तर तो पिण्यायोग्य असतो,

तोच गटारात पडला तर मात्र त्याची

प्रतिष्ठा, इतकी ढासळते की,

तो पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही,

तोच थेंब गरम तव्यावर पडला तर त्याचे,

अस्तित्व संपून जाते,

तो नष्ट होतो,

कमळाच्या पानावर पडला तर तो मोत्यासारखा चमचम करतो,

आणि शिंपल्यात पडला तर तो मोतीच बनतो. थेंब तोच ,

परंतु कुणाच्या सहवासात येणार,

यावर त्याचे अस्तित्व,

 त्याची पत, प्रतिष्ठा अवलंबून असते..... 


Rate this content
Log in